प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शुक्रवार,30 एप्रिल 2021
▶️ 1 मे सकाळी 7 ते 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू; निर्बंधात वाढ करून कोरोना साखळी तोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न!
▶️ महाराष्ट्र लॉकडाऊन: जिल्हाबंदी, थांब्यावर उतरलेल्या प्रवाशांना होम क्वारंटीन स्टॅम्प, तर प्रवासी उतरण्याच्या ठिकाणी रॅपिड अँटिजिन टेस्ट करण्याबाबत निर्णय घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारापर्यंत लॉकडाऊनच्या नियमात अनेक बदल
▶️ देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनामुक्त; 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दिल्ली येथील एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर आज ते कोरोना मुक्त झाले
▶️ लग्नानंतर 10 वर्षाने अदिती मलिक आणि ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ फेम मोहित मलिक या टिव्ही कलाकार जोडीच्या घरी हलला पाळणा; पुत्ररत्न प्राप्ती झाल्यावर सोशल मीडियावर झाला शुभेच्छांचा पाऊस
▶️ ‘कंगना कृपा करून तू देशाची सेवा कर तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना देखील मदत कर…’ , राखी सावंत चा कंगनाला सल्ला
▶️ मेरठ मधील नीरज उपाध्याय या विद्यार्थ्याचा सोशल डिस्टनसिंग साठी अजब फॉर्म्युला; असे ब्रेसलेट बनवले जे सामाजिक अंतर राखले नाही तर लागतो करंट!
▶️ कोव्हीशिल्ड नंतर कोव्हॅक्सीन लस सुद्धा झाली स्वस्त; 600 ऐवजी 400 रुपयांत मिळणार राज्यांना लस, भारत बायोटेकने दिली माहिती
▶️ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण; संबंधित माहिती स्वतः देत पंकजा मुंडे यांनी आपण विलगीकरणात असल्याचं सांगितलंय. तर ‘ताई लवकर बरी हो’ अशी भावनिक साद बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घातली आहे.
▶️ कोल्हापूर शहरात एप्रिलमध्ये वातावरणात गारवा आणि गारांचा जोरदार पाऊस, तर सलग तीन दिवस जिल्हयात झाली गारपीट!
▶️ देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पहाता आता रिलायन्स फाऊंडेशन आणि नीता अंबानी यांचा पुढाकार; गुजरातच्या जामनगरमध्ये 1000 बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून यात होणार विनामूल्य उपचार