धक्कादायक:विरार येथे कोविड रुग्णालयात आग,13रुग्णांचा मृत्यू!

विरार (वृत्तसंस्था) विरार पश्चिम येथील विजय वल्लभ कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर ए.सी च्या स्फोटामुळे आग लागली असून त्यामध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 17 रुग्ण अडकले होते. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि त्यांची सुटका करण्यात आली. तर 4 रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागात रात्री 3 वाजल्याच्या सुमारास लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता विभागातील 13 रुग्ण दगावले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आग विझवली असून रुग्णांना हलविण्यात आले आहे.

