शुक्रवार, 23 एप्रिल 2021

▶️ विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील 17 रुग्णांपैकी 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

▶️ जळगावात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी, शहरातून आतापर्यंत 11 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांची धडक कारवाई

▶️ महाराष्ट्रात 6,99,858 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 33,30,747 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 62,479 रुग्णांचा मृत्यू

▶️ सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आता ऑनलाईन होणार, 37 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा मानस; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

▶️ आयपीएल 2021: बंगळुरुकडून राजस्थानचा दारुण पराभव, देवदत्त पडिक्कलचे शानदार शतक; राजस्थान रॉयल्सचे 178 धावांचे लक्ष्य आरसीबीने एकही विकेट न गमावता केले पूर्ण

▶️ भारतात 24,22,080 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,36,41,606 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,86,928 रुग्णांचा मृत्यू

▶️ कोरोनामुळे प्रसिद्ध संगीतकाराचा मृत्यू: ‘आशिकी’ चित्रपटाला संगीतबद्ध केलेल्या नदीम-श्रवण जोडीतील श्रवण राठोड यांचे निधन

▶️ 500 रुपयामध्ये बनावट कोरोना निगेटिव्ह अहवालाची विक्री, भिवंडीत लॅबोरटरीच्या मालकासह चौघांना अटक; लॅबमधून मोठ्या प्रमाणावर बनावट तपासणी अहवाल जप्त

▶️ सरकारने मोफत लसीकरणाची जबाबदारी टाळली; 18 वर्षांवरील सर्व लोकांचे भेदभाव न करता लसीकरण व्हावे; सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!