दातृत्वाला सलाम!आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दहा हजारांची मदत!

0

पारोळा (प्रतिनिधी)गेल्या वर्षभरापासून देशासह महाराष्ट्र राज्यावरही कोरोना महामारीचे संकट ओढवले असून सद्य: स्थितीत ते अधिकच गंभीर झाले आहे.को्रोना बाधितांवर उपचार, प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण, फवारणी जनजागृती/प्रबोधन इत्यादी बाबतीत शासनासह. प्रशासनातील सर्व घटक स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य पोलीस व सर्व स्वयंसेवी संस्था देखील आपापल्या परीने अविरत व अपार मेहनत घेत आहेत.
या संकट निवारण कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून या उदात्त हेतूने राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश येथील तहसीलदार अनिल गवांदे यांच्याकडे सुपुर्द करुन पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.तालुक्यातून अशी स्वेच्छेने मदत करणारे पहिले नागरिक म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावसार सरांचे अभिनंदन करुन धन्यवाद देखील दिले आहेत.
भावसार सरांनी आतापर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधीत ५० हजार रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतही ५२ हजार रुपये मदत केली आहे विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम देखील ते नियमितपणे व्यक्तीश: स्वखर्चाने राबवत असतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!