कृ.उ.बाजार समिती,100 बेड चे कोविड रुग्णालय सुरू करण्यास तयार,परवानगी द्या!-सभापती अमोल पाटील

पारोळा(प्रतिनिधी) पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती 100 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यास तयार असून शासनाने फक्त परवानगी द्यावी अशी मागणी सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे. असे कोविड रुग्णालय सुरू झाले,तर महाराष्ट्रातील पहिला प्रयोग राहील.
सभापती अमोल पाटील असे म्हटले आहे की,पारोळा,एरंडोल तालुक्यासह संपूर्ण विश्वात कोरोना विषाणूंचा हाहाकार सर्वत्र पसरलेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत व मृत्यु दरात मोठी वाढ होतांना दिसत आहे, पारोळा कुटीर रुग्णालयात ऑक्सिजन बेड व बिना ऑक्सिजन बेड कमी असल्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे.कुटीर रुग्णालयात बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांची खासगी रुग्णालयांमध्ये मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. त्याच अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा यांनी सदरील रुग्णाचे हाल बघता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हरिनाथ मंगल कार्यालय येथे ऑक्सिजनचे 25 बेड व बिना ऑक्सिजनचे 75 बेड असे एकूण शंभर बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यास तयार आहेत तसेच सदर कोविड रुग्णालय, पारोळा कुटीर रुग्णालयाशी संलग्न ठेवून वैद्यकीय सेवेसाठी शासकीय यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय सेवेचे कर्मचारी शासनाकडून पुरविण्यात यावे.तरी सदर कोविड रुग्णालय सुरू करण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे केले आहे. या पत्राला अनुसरून पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनीही जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
जर असे बाजार समितीत कोविड रुग्णालय सुरू झाले,तर सर्वसामान्य रूग्णांना त्याचा फायदा होणार आहे.
