माझ्या भूमीत बोगस इंजेक्शन रोखण्यामुळे मी बदनाम होत असेल तर लाख वेळा होईल -आ.अनिल पाटील

0

▶️ मोठा मलिदा लाटण्याचा डाव उलथविल्याने माजी आमदारांचा जळफळाट होत असल्याचा आरोप

अमळनेर (प्रतिनिधी) भूमिपुत्र या नात्याने माझ्या भूमीत जे जे बोगस येईल त्यास माझा कायम विरोध असणार असून याच पद्धतीने माजी आमदारांनी आणलेल्या आणि कोणतीही परवानगी नसलेल्या तथा कोणते ड्रग्स त्यात आहे ते माहीत नसलेल्या इंजेक्शनला जनहीतासाठीच रोखण्याचा प्रयत्न मी केला आहे,कुणाला हे चुकीचे वाटत असेल आणि त्यामुळे माझ्या बदनामीचा प्रयत्न ते करीत असतील तर हरकत नाही माझ्या जनतेसाठी एक लाख वेळा बदनाम होण्याची माझी तयारी आहे असा पलटवार अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रेमीडिसिव्हर इंजेक्शन संदर्भात आमदार अनिल पाटील यांचेवर पत्रकार परिषदेत विविध आरोप करून सदर इंजेक्शन न मिळण्यास आमदारच जवाबदार असल्याचा आरोप केल्याने आमदार अनिल पाटील यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदारांना लक्ष केले,यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की रेमीडिसिव्हर इंजेक्शन चा साठा उपलब्ध असताना महाराष्ट्र शासन काहीच प्रयत्न करीत नाही असा माजी आमदारांचा आरोप आहे,असे समजा महाराष्ट्रात महाआघाडी सरकार असल्याने ते या कंपनीच्या इंजेक्शन ला विरोध करीत असावेत परंतु,ज्या भाजपा सत्तेत असलेल्या राज्यात हे इंजेक्शन विक्री करण्यास का परवानगी मिळत नाही हा माझा प्रश्न आहे,भारतातील एकही राज्य आणि केंद्रातील सरकार या इंजेक्शनला विक्री करण्यास परवानगी देत नाही याचा अर्थ काय?हे जनतेने समजून घेण्याची गरज असून यांनी कितीही आकांडतांडव केले तरी त्याला परवानगी मिळणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे,आणि असे मान्यता नसलेले इंजेक्शन आम्ही का म्हणून टोचून घ्यावेत,त्याच्यात कोणते ड्रग्स आहेत,पाणी आहे की जहर आहे हे तरी आपण तपासले पाहिजे उद्या उठून कुणीही येईल आणि कोणतेही इंजेक्शन टोचून जाईल हे कसे खपवून घ्यायचे. भारतात हे इंजेक्शन विक्री करण्यास परवानगी का नाही यामागे निश्चितपणे ठोस कारणे असलीच पाहिजे.खरे पाहता जनसेवा आणि काळाबाजार यात फरक असतोच,ब्रँडेड म्हणजे मान्यता प्राप्त कंपनीच्या इंजेक्शन चा तुटवडा आहे म्हणून कुठूनतरी कमी भावात इंजेक्शन मिळवायचे आणि त्यातील थोडेफार वाटून बाकी काळ्याबाजारात विकायचे असाच त्यांचा प्रयत्न होता,भारतात फक्त सात कंपनीला रेमीडिसिव्हर विक्री ची परवानगी आहे,एफडीए च्या माध्यमातून ही परवानगी घ्यावी लागते त्यानंतरच ही विक्री करता येते,एखाद्या कोणत्याही बाटलीवर रेमीडिसिव्हर लिहले म्हणून आपण टोचून घ्यायचे हे चुकीचे असून,ब्रूक फार्मा सारख्या कंपनीस तशी परवानगी दिल्यास आमची काही हरकत राहणार नाही,प्रत्यक्षात त्या इंजेक्शन ला कोणत्या देशात परवानगी आहे ते देखील तपासले पाहिजे,यात कोणते ड्रग्स आहेत ते पाहिले पाहिजे,त्याचे साईड इफेक्टस बघितले गेले पाहिजे,खरेतर या सारख्या इंजेक्शन मुळेच आपल्याकडे मयत होण्याचे प्रमाण वाढले आहे,एवढेच नव्हे तर कुणाची किडनी तर कुणाचे डोळे तर कुणाचे ब्रेन डेड होण्याचे साईड इफेक्टस झाले आहेत,सदर ब्रूक फार्मा कंपनीच्या एका व्हायल ची किंमत 500 पर्यंत असून ती एक्सपोर्ट ची किंमत आहे पण यांनी तेच 1500 ते 3000 रुपयाना विकून टाळू वरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे.
जनसेवेचा हे आव आणतात आणि मी विरोध करतो असे म्हणतात मात्र एक वर्षांपासून कोरोना काळात हे बोगस दारू विक्रीतच गुंतले होते,यामुळे अनेक गुन्हे यांच्यावर दाखल झालेत,यांच्याकडे फार्मा चे लायसन होते तर यांनी या कंपनीस रेमीडिसिव्हर भारतात विकण्यासाठी यांनी एफडीए कडे परवानगी का मागितली नाही,शासनाने आता निर्यात बंद केली म्हणून त्यांचे दुकान लावायला हे तयार झाले आहेत,त्यावेळी परवानगी घेतली असती तर असा काळाबाजार करण्याची वेळच यांच्यावर आलीच नसती, ज्यावेळी ड्रग्स अथोरिटी म्हणजेच एफडीए म्हणेल की हे ओरिजिनल रेमीडिसिव्हरच आहे तेव्हाच मी याला रेमीडिसिव्हर म्हणेल मात्र तोपर्यंत याला लोकांच्या जीवाशी खेळण्यास माझा विरोधच राहील, यांना जनसेवाच करायची होती तर चांगल्या मान्यता प्राप्त कम्पनीचे इंजेक्शन वाटले असते,पण तसे यांनी केले नाही.
येत्या सोमवार पासून मी शासनाकडे तगादा लावणार आहे की यांना सदर कंपनीचे इंजेक्शन एक्सपोर्ट साठी स्टोक करायला परवानगी होती का?असेल तर किती स्टोक ची होती,खरे पाहता निर्यात बंद झाल्याने मोठा स्टोक स्वस्तात घेऊन त्याचा काळाबाजार यांना करायचा होता,मी तक्रार केली त्यामुळे यांचे कोट्यावधी चे नुकसान झाले,त्यामुळे हा जळफळाट होतोय.
लोकप्रतिनिधी म्हणून कोविड काळात मी काय केले ते सर्व जनतेने पहिलेच आहे. वारवार कोविड सेंटरला जाऊन बेडस,सुविधा,औषध उपलब्धता, ऑक्सिजन याचा वेळोवेळी आढावा मी घेतला असून खाजगी रुग्णालयाच्या नेहमी संपर्कात राहिलो आहे,एवढेच काय मागील वर्षी कोविड प्रादुर्भाव सुरू होताच पहिला कॅम्प घेणारा आमदार मी होतो,मला कायम कोरोना होण्याचे स्वप्न यांना जरी पडत असतील तरी जनतेच्या आशीर्वादाने माझे काही बिघडणार नाही यांनी काळजी करू नये असा टोला आमदारांनी लगावला.
▶️एक नंबरचे उद्योग केल्यास नक्कीच खांद्याला खांदा लावून उभा राहणार
जनसेवेसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहा असे आवाहन माजी आमदारांनी केले होते,त्यावर बोलताना अनिल पाटील म्हणाले की एक नंबर चे उद्योग करा मी नक्कीच खांद्याला खांदा लावून उभा राहील मात्र अवैध दारू,अवैध इंजेक्शन,यासह इतर अवैध धंदे यासारख्या दोन नंबरच्या उद्योगांसाठी मी कधीही उभा राहणार नाही चांगले कामात मीच काय संपूर्ण तालुका उभा राहील असे अनिल पाटील म्हणाले,तसेच वाटप झालेले इंजेक्शन आम्ही तपासायला आम्ही पाठविणार आहोत,ते घातक निघाल्यास जे जे कुणी त्यात दोषी ठरतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडू असा इशारा आमदार अनिल पाटील यांनी दिला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!