या राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची होणार कोरोना चाचणी!

0

जळगाव (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरु आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहे. त्याचे तंतोतंत पालन होण्यासाठी केरळ, गोवा, दिल्ली/एनसीआर दिल्ली, राजस्थान, गुजरात व उत्तराखंड या संवेदनशील राज्यातुन जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, रावेर या स्थानकावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनींग व रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यासाठी या रेल्वे स्थानकांवर 24 तास स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी दिले आहे.
जळगाव मनपा क्षेत्रात आरोग्य अधिकारी मनपा यांनी व तालुक्याच्या ठिकाणी संबधित मुख्याधिकारी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेशी समन्वय साधून रेल्वे स्थानकावर 24 तास स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. पॉझिटीव्ह आढळून आलेल्या प्रवाशांना जवळच्या कोविड सेटरला 14 दिवस अलगीकरण करण्यात यावे व रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर 14 दिवस होम कॉरंटाइनचा शिक्का मारण्यात यावा. यासाठी रेल्वेचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही त्यांनी आदेशात दिल्या आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!