टाटा स्टील पुरवणार ३०० टन ऑक्सिजन;कोरोनाच्या लढाईत पुन्हा जिंकू!-रतनजी टाटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)देशात कोरोनाचे संकट वाढतच आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वात जास्त तडाखा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात काही दिवसांपासून 60 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. अशा प्रसंगी उद्योजक रतन टाटा पुन्हा एकदा देशाच्या मदतीला धावून आले आहेत. उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावले असून २०० ते ३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
‘कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्ही देखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,’ असे ट्विट टाटा स्टीलने केले आहे.