सोमवार, 19 एप्रिल 2021

▶️ परराज्यातून ट्रेनने येणाऱ्यांसाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी अनिवार्य, प्रवासाच्या वेळेपासून 48 तासांमध्ये चाचणी करावी लागणार; नवी नियमावली जाहीर

▶️ महाराष्ट्रात 6,70,388 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 31,06,828 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 60,473 रुग्णांचा मृत्यू

▶️ अहमदनगर: शिर्डीत ऑक्सिजन प्रकल्प, आरटीपीसीआर चाचण्यांची सोय, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचीही उपलब्धता करून देण्यात येणार, येत्या 10 दिवसांत यंत्रणा उभी होणार

▶️ आयपीएल 2021 : पंजाब किंग्सने दिल्लीला 196 धावांचे दिले होते आव्हान; दिल्लीने 6 गडी राखून पंजाबचा केला पराभव, शिखर धवनच्या 49 चेंडूत 92 धावा

▶️ एकनाथ खडसेंचे विरोधकांवर टीकास्त्र: ‘मीपण विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात असा खेळ केला नाही’

▶️ भारतात 19,23,877 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,29,48,848 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,78,793 रुग्णांचा मृत्यू

▶️ सुशांत केससंबंधीत ड्रग्सचे प्रकरण: NDPS कोर्टाने केले NCB च्या चार्जशीटचे कौतुक; सध्या 33 आरोपींना ठरलेल्या तारखेला कोर्टात व्हावे लागणार हजर

▶️ धक्कादायक: जळगावमधील पहूर येथे 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार, फूस लावून नेण्यात आलं होतं निर्जन स्थळी; पोलिसांनी संशयित आरोपीला केली अटक

▶️ फडणवीसांनी सरकारी कामात हस्तक्षेप करत पोलिसांवर दबाव टाकला, त्यावर काही कारवाई करायची की नाही, याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

▶️ 2022-21 मध्ये प्रवासी वाहनांच्या एक्सपोर्टमध्ये 38.92% ची घट, केवळ 4.04 लाख गाड्यांची झाली निर्यात; वाहन निर्यातीत ह्युंदाई टॉपवर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!