लिलाबाई उत्तम महाजन यांचे दुःखद निधन

अमळनेर- येथील माळी वाड्यातील रहिवाशी लिलाबाई उत्तम महाजन यांचे काल १७ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तरी त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 7.30 वाजता शासकीय पद्धतीने करण्यात आला आहे. उत्तम शिवराम महाजन यांच्या त्या धर्मपत्नी तर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या वहिनी होत.
सध्या कोराना संकट असल्याने राज्यात लॉकडाऊन आहे आपणा सर्वांचे आमच्यावर नितांत प्रेम आहे सध्याची भीषण परिस्थिती व आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या विचार करून आपल्या सद्भावना आमच्या पर्यंत पोहोचल्या आहेत तरी कृपया घरी राहा ,कोणीही द्वार दर्शनासाठी येऊ नका, आपल्या आरोग्याची काळजी घ्या….असे आवाहन तहसीलदार सुदाम महाजन यांनी केले आहे.