प्रभाग क्रमांक १५ मध्ये रस्त्याच्या डांबरीकरणास सुरवात

अमळनेर (प्रतिनिधी) नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील श्रीकृष्णपुरा, मोहाडीकर प्लॉट भागातील रस्ते माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलताताई पाटील यांच्या सहकार्यातून अन् माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या पाठपुरावा, प्रयत्न म्हणून आज रस्त्याच्या डांबरीकरण कामास सुरवात करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, योगीराज चव्हाण, कैलास सोनार, कैलास पाटील, शुभम साळी, पप्पू भावसार डी. के. पेंटर, सोनू सोनार, बंटी महाजन, प्रवीण ठाकूर आदी सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सदर डांबरीकरण रस्त्याचा कामाची सूरवात कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलताताई साहेबराव पाटील यांचे सह माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.