शुक्रवार, 16 एप्रिल 2021

▶️ कडक लॉकडाऊनच्या हालचाली, 2 दिवसांत उचलणार कठोर पावले; लोकल रेल्वेची दारेही सामान्यांसाठी बंद करण्याचे संकेत, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

▶️ हाफकिनमध्ये कोवॅक्सीन लसनिर्मितीस केंद्राची मान्यता; मुख्य सचिव कुंटे यांना लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या पुढील सूचना

▶️ महाराष्ट्रात 6,20,060 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 29,59,056 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 59,153 रुग्णांचा मृत्यू

▶️ आयपीएल 2021 : प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 विकेट गमावून 147 धावा; प्रत्युत्तरात राजस्थान टीमने केल्या 7 विकेट गमावून 150 धावा

▶️ धक्कादायक: आंध्रप्रदेशातील विशाखपट्टनम जिल्ह्यात जट्टादा गावात मुलीवर बलात्कार करणाऱ्याच्या कुटुंबातील 6 जणांची वडिलांकडून हत्या; बलात्कार करणारा अद्याप फरार

▶️ 200 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपकर्त्याचा दावा: जामनेर कॉम्प्लेक्स घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती जळगावात; भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आला आरोप

▶️ भारतात 15,63,588 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,25,43,978 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,74,335 रुग्णांचा मृत्यू

▶️ पंढरपूर मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 17 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी मतमोजणी; अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही

▶️ मुंबईच्या स्टेशनवर प्रवासी मजुरांचे हाल, गावाकडे जाण्याची आस लावून बसलेल्या लोकांकडे खायलाही पैसा नाही; 3-3 दिवसांपासून स्टेशनवर

▶️ चित्रपटासंदर्भातल्या संघटनांनी बंदिस्त जागेतल्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला परवानगी देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली पत्राद्वारे विनंती

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!