प्रजाराज्य न्यूज-हेडलाईन्स

गुरुवार,15 एप्रिल 2021
▶️ मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश: राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा
▶️ महाराष्ट्रात 6,12,070 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 29,05,721 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 58,804 रुग्णांचा मृत्यू
▶️ आयपीएल 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सनरायजर्स हैदराबादचा 6 धावांनी पराभव, बंगळुरुने दिले होते 150 धावांचे आव्हान; बंगळुरूच्या शाहबाजने एका ओव्हरमध्ये घेतल्या 3 विकेट
▶️ भारतात 14,65,877 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,24,26,146 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,73,152 रुग्णांचा मृत्यू
▶️ रस्त्यांसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक 682 कोटी, विविध राज्यांतील रस्त्यांसाठी 6934 कोटी रुपये
▶️ नियमांचे पालन करून चित्रीकरणासाठी वाहिन्या आग्रही, आठवड्याभराचेच चित्रीकरण उपलब्ध; जुन्या भागांसह अन्य पर्यायांची चाचपणी
▶️ आमच्यासाठी 2 दिवसात पॅकेज जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, नाभिक समाजाचा राज्य सरकारला इशारा
▶️ गर्दी होत असल्यास संबंधित दुकाने मोकळ्या जागेत स्थलांतरित करा, गर्दीवर नियंत्रण आणणे शक्य नसल्यास जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बंद करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
▶️ ‘हे सरकार पाडणारा जन्माला यायचाय’, फडणवीसांना अजित पवारांचे उघड आव्हान; पंढरपूरमध्ये फडणवीस-अजित पवार यांच्यात वाकयुद्ध
▶️ एकदिवसीय क्रमवारीत आझमची कोहलीवर सरशी; आझमने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत 94 धावांची खेळी साकारल्याने कोहलीला मागे टाकले