खा.शि.मंडळाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र जैन तर कार्योपाध्यक्षपदी कल्याण पाटील!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी जितेंद्र मोहनलाल जैन यांची तर कार्योपाध्यक्षपदी कल्याण साहेबराव पाटील यांची संस्थेच्या बैठकीत निवड करण्यात आली.विद्यमान चेअरमन योगेश मुंदडा यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर ही निवड करण्यात आली यावेळी संचालक हरी वाणी, योगेश मुंदडा,नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल डॉ.संदेश गुजराथी, डॉ.बी.एस.पाटील या संचालकांच्या उपस्थित निवड करण्यात आली.यावेळी माजी संचालक विनोद पाटील उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल व पुढील वाटचालीसाठी प्रजाराज्य न्यूज तर्फे शुभेच्छा!