मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आमदार चिमणराव पाटील यांची व्हीडीओ काँन्फरन्स व्दारे चर्चा!

0

पारोळा (प्रतिनिधी) काल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांची व्हीडीओ काँन्फरन्स व्दारे महत्वाची बैठक पार पडली.
याबैठकीत आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघासह जळगांव जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रूग्णांची, रेमडिसिवर इंजेक्शन व आॕक्सिजनचा तुटवडा, बेडच्या कमतरतेमुळे होत असलेली गैरसोय, त्यासोबतच वीज बिलांमुळे शेतकऱ्यांना व घरगुती वीज धारकांना होत असलेली अडचण, लाॕकडाऊन केल्यास स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या अडचणी,१०वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन योग्य त्या उपाययोजना अश्या मतदारसंघातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. तसेच या समस्यांवर विचार करून लवकर यावर उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार चिमणराव पाटील यांना आश्वासित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!