महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुरक्षा ,स्वच्छता आणि अतिक्रमण संदर्भात भीम आर्मीचे नगरपरिषदेला निवेदन!

▶️ दोन तीन दिवसात तात्काळ दखल न घेतल्यास संगठना रस्त्यावर उतरण्याचा इशारा
पारोळा (प्रतिनिधी) शहरात पारोळा नगरपरिषदेचे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय आणि राणी लक्ष्मीबाई या महापुरुषांच्या पुतळे आहेत.
सध्या या महापुरुषांच्या पुतळ्यांची आणि परिसराची स्थिती अतिशय नाजूक झाली असून त्या ठिकाणी सांडपाणी, दारूच्या बाटल्या,अंड्याची टरफले अश्या अस्वच्छतेचे आणि अतिक्रमणाचे साम्राज्य पसरलेले आहे,तर डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळील लाईट हि अनेक दिवसापासून बंद आहे.
काही दिवसात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांची जयंती येऊन ठेपली असताना देखील नगरपालिकेने त्याकडे अजूनही लक्ष दिलेले नाही. येणाऱ्या दोन-तीन दिवसात नगरपालिकेने महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुरक्षा ,स्वच्छता व अतिक्रमाबाबत पाऊल न उचलल्यास किंवा कार्यवाही न घेतल्यास भीम आर्मी सामाजिक संघटना रस्त्यावर उतरण्याचा इशारा भीम आर्मी चे तालुकाप्रमुख जितेंद्र वानखेडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी प्रतापभाऊ पाटील ,भाऊसाहेब सोनवणे , मनोहर केदार ,सचिन खेडकर इत्यादी उपस्थित होते.