लोकसंघर्ष मोर्चा निःशुल्क कोविड सेंटर ठरत आहे शेकडो कोरोनाग्रस्तांचा आधार!

0

▶️ आजपर्यंत २४५ रुग्ण बरे होऊन घरी परतले

जळगाव (प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने कोरोनाचा वाढता प्रकोप बघून व कठीण काळातील गरज ओळखून दि. १७ मार्चपासून येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतीमध्ये निशुल्क कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. तेव्हापासून या निःशुल्क सेंटरमध्ये ३४१ रुग्ण दाखल झाले असून तब्बल २४५ कोरोनाबाधित रुग्ण पुर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. लोकसंघर्ष कोविड केअर सेंटर मध्ये सद्यस्थितीत ९२ कोविड पॉजिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यामध्ये ५५ पुरुष, ३३ स्त्री रुग्ण व ४ लहान मुलामुलींचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात दररोज हजारो नागरिक कोविड ग्रस्त असल्याचे आढळून येत आहेत. कोरोना महामारीचा मोठा प्रकोप सर्वत्र बघायला मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी सहजतेने बेड उपलब्ध होण्यास अडचण येत आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ‘लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर’ सुरु केले. समाजातील दात्यांच्या मदतीने येथे दाखल असलेल्या रुग्णांना निःशुल्क आरोग्य सेवा, औषधोपचार, भोजन, नाश्ता, चहा, दूध, अंडी, पोषक आहार व निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शहरातील तसेच जिल्ह्यातील शेकडो रुग्ण या सेवांचा लाभ घेत आहेत. येथील सर्व व्यवस्थेसाठी प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनात सचिन धांडे, छोटूभाऊ, भरत कर्डिले, विशाल भाई, दामोदर भारंबे, कलींदर तडवी, किरण, प्रमोदभाऊ आदी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!