श्रीमती अन्नपूर्णाबाई पवार यांचे दुःखद निधन

अमळनेर (प्रतिनिधी) खेडी (ता.अमळनेर) येथील रहिवासी श्रीमती अन्नपूर्णाबाई जानकीराम पवार (वय-75) यांचे दि.8 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 5 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परीवार असून त्या प्रकाश पवार व एस. एन. डी. टी. कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.श्याम पवार यांच्या मातोश्री तर आदित्य मेडिकलचे महेश पवार यांच्या आजी होत्या. त्यांच्यावर ताडेपुरा येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.