क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घराघरात साजरी करा!-शिवाजी महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) दरवर्षाप्रमाणे यंदाही 11 एप्रिल रोजी थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती व 14 एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आलेली असुन पुन्हा जगभरासह आपल्या महाराष्ट्रातही कोरोना सारख्या भयंकर विषाणुने मोठे थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे मास्क लावणे हे कटाक्षाने गरजेचे आहे.परंतु मागील काही दिवसात ज्या प्रकारे रुग्ण संख्या वाढली आहे,ती परिस्थिती पाहता त्या पार्श्वभुमीवर समस्त फुले,शाहू,आंबेडकर प्रेमींनी क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने घराघरात साजरी करूया. या दोन्ही महापुरुषांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गर्दी न करता प्रत्येकांने घरीच जयंती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे.
थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्री शिक्षणाबरोबर सामाजिक आरोग्यालाही अनन्य साधारण महत्व आपल्या कार्यातुन दिलेले आहे.तत्कालीन परिस्थितीत पुण्यात प्लेगच्या साथीने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना,प्रसंगी स्वतःचा जिवीताचाही विचार न करता नागरीकांचे जीव वाचावे यासाठी फुले दाम्पत्यांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे.ज्या महापुरुषांनी आपल्यावर समाजरक्षणाचे संस्कार घालुन दिलेले आहेत, त्याचमहापुरुषांच्या जयंती दिनी त्यांचे विचार आदर्श माणुन कुठेही गर्दी न करता शासनाचे नियम न मोडता महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरात राहुन आपल्या कुटुंबीया समवेत साधेपणाने घराघरात साजरी करावी.
कोरोना लसीकरण सर्वांनी प्राधान्याने करुन घ्यावे, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग आदींचे काटेकोर पालन करावे. या सर्व गोष्टींच गांभीर्य ओळखून योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आपण सर्वांनी सामाजीक जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे नाशिक विभा.उपाध्यक्ष शिवाजी महाजन यांनी समस्त फुले,शाहू,आंबेडकर प्रेमींना केले आहे