चोपड़ा पोलिसांची कार्यवाही;दीड लाखाचा गुटखा जप्त!

चोपडा(प्रतिनिधी)पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बसस्थानकाच्या मागे असलेल्या पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधी पान येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.यावेळी पोलिसांच्या पथकाने सापळा लावून महाराष्ट्र राज्य मनाई व मानवी शरीरास हानिकारक असलेला दिड लाखाच्या गुटखा व साडेतीन लाखाची प्याजो रिक्षा असा एकूण पाच लाखाचा मुद्देमाल रंगेहात पकडून जप्त करण्यात आला आहे .
याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून मात्र दुसरा आरोपी फरार झाला आहे . पोलिसांच्या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांवर मध्ये खळबळ उडाली आहे . शहरातील पाटील गढी भागात गुरुवारी सकाळी गुटखा व सुगंधित पान मसाल्यांची रिक्षा येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळाली , यावेळी पोलिसांच्या पथकाला सापळा लावून कारवाई करण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले .
माहितीप्रमाणे बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या पाटील गढी भागातील रहिवासी बाबुराव कौतिक मराठे यांच्या घराजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजता एक अनोळखी प्याजो रिक्षा क्रमांक एम एच 19 , 3721 पिवळ्या रंगाची विमल गुटखा व सुगंधी तंबाखू आदी साहित्य भरलेली आली असता ,पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण ,पो ना संतोष पारधी,पो.ना.शेषराव तोरे,पो ना ज्ञानेश्वर जवागे,पो कॉ गजानन पाटील ,पो कॉ सुभाष सपकाळ ,पो कॉ सुमेर वाघेर यांच्या पथकाने तिच्यावर धडक कारवाई केली .
यावेळी महाराष्ट्र राज्यात मनाई असलेला व मानवी शरीरास हानिकारक असलेला रिक्षातील एक लाख 50 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल आढळून आल्याने आकीब खान असलम खान (वय -20) रा. चोपडा याला रंगेहात पकडून अटक केली आहे .यावेळी त्याच्याकडून तीन लाख 50 हजार रुपये किमतीची पिवळ्या रंगाची एक लाख 50 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे .
याप्रकरणी पो कॉ सुमेर वाघेर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं 120/21अन्वये भादवि कलम 328 , 272 व 273 प्रमाणे आकीब खान असलम खान रा चोपडा व आकाश योगेश अग्रवाल रा गुजराती गल्ली रा चोपडा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकीब खान असलम खान यास पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी आकाश योगेश अग्रवाल गुजराथी गल्ली हा फरार झाला आहे .पुढील तपास पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना संतोष पारधी करीत आहेत …