चांगली बातमी; ८३ वर्षीय आजी बाईने केली कोरोनावर मात!

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला असतांना मात्र अमळनेर ग्रामीण रूग्णालयातून आज रोजी ८३ वर्षीय आजी श्रीमती शकूंतलाबाई तूळशीराम सोनार या सूखरूप घरी परतल्या. १० दिवसांपूर्वी शहरात कूठेही खाजगीत बेड उपलब्ध नसल्याने प्रांताधिकारी सीमा आहिरे, डॉ प्रकाश ताडे यांच्या सहकार्याने इंदिरा भवनातील कोविड सेंटरमध्ये आजींचे ७० ते ७२ आँक्सीजन असतांना ३ दिवस उपचार केलेत आँक्सीजन पातळी वाढण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात डॉ.ताडे यांनी बेड उपलब्ध केला. आठवडाभरात आजींचे आँक्सीजन लेव्हल ९५ पर्यंत आले डॉ प्रशांत कूलकर्णी व ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानेच ८३ वर्षीय आजीबाई आज घरी पोहचल्यात,त्या बद्दल त्यांच्या नातेवाईकांनी सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सहकारी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
डॉ तनूश्री फडके डॉ शिरिन बागवान डॉ अशिष पाटील डॉ नरेंद्र पाटील डॉ परेश पवार हे ग्रामीण रूग्णलयातील वैद्यकीय स्टॉप व त्यांचे सहकारी अहोरात्र रूग्णांना सेवा देत आहेत.
कोरोना महामारी ने नागरिकांमध्ये सद्या घबराहट पसरली आहे मात्र नागरीकांनी घाबरून जावू नये शासनाचे नियम पाळावे सद्याच्या इंदिरा भवनातील कोविड सेंटर मध्ये उद्या पर्यंत सिलेंडर येतील व २३ बेड आँक्सीजनचे होतील ग्रामीण रूग्णालयातही ३३ आँक्सीजन बेड सद्या सूरू आहेत.सकारात्मक दृष्टीकोन ठेवून घाबरून न जाता काळजी घ्यावी.
-डॉ प्रकाश ताडे
वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण रूग्णालय अमळनेर