प्रजाराज्य न्यूज – आजच्या हेडलाईन्स!

मंगळवार, एप्रिल 2021
▶️ अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी केला मंजूर; आता महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
▶️ अहमदनगर: भारताचा नामांकित क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याच्या आजी झेलूबाई बाबूराव रहाणे यांचे निधन
▶️ घरकाम करणारे, स्वयंपाकी, परीक्षार्थी, वाहन चालकांना रात्री 8 नंतर तसेच शनिवार व रविवार संपूर्ण टाळेबंदीच्या काळात ये-जा करण्यास परवानगी; निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला
▶️ महाराष्ट्रात 4,51,375 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 25,49,075 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 56,033 रुग्णांचा मृत्यू
▶️ कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिर, देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेली सर्व मंदिरे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय
▶️ गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख दिल्लीला, काल रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या घरी खलबतं, 5 ते 6 वकिलांची फौजही सोबत
▶️ 25 वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती
▶️ गुगल स्टॅक अॅप लवकरच भारतात येणार; कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ बनवता येणार, फाईल्सना नाव देवून सेव्ह ही करणार
▶️ भारतात 7,83,844 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,17,30,054 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,65,577 रुग्णांचा मृत्यू
▶️ इतके गंभीर आरोप मंत्र्यांपासून ते पोलिसांपर्यंत लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाहीत- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस