प्रजाराज्य न्यूज – आजच्या हेडलाईन्स!

सोमवार 5 एप्रिल 2021
▶️ महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन: रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी, शनिवारी आणि रविवारी कडकडीत बंद
▶️ महाराष्ट्रात 4,30,503 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 25,22,823 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 55,878 रुग्णांचा मृत्यू
▶️ बंदी आदेश धुडकावून नगरसेविकेच्या मुलीचा धडाक्यात विवाह; कल्याणमध्ये मंगल कार्यालय व्यवस्थापकासह वधुपित्यावर गुन्हे
▶️ बिजापूर चकमक हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश नाही, नक्षलविरोधी अभियान सुरुच राहणार : मुख्यमंत्री बघेल
▶️ अहमदनगर : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळाच्या सत्रात घेण्याची शिक्षक भारती संघटनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
▶️ मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन: ‘राज्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे, लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागेल, मनसेने सहकार्य करावे’
▶️ भारतात 7,37,870 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,16,79,961 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,65,132 रुग्णांचा मृत्यू
▶️ बॉलिवूडमध्ये कोरोना: अक्षय कुमारनंतर 57 वर्षीय गोविंदा कोव्हिड पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी पत्नीला झाला होता कोरोना
▶️ पुणे महापालिकेचे आवाहन: करोनाने घरी निधन झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार वैकुंठ वगळता अन्य स्मशानभूमीत केले जाणार, नागरिकांनी कैलास, येरवडा, औंध, कोरेगाव पार्क, कात्रज सह इतरत्र अंत्यसंस्कारासाठी जावे.
▶️ रविवारी अकोला येथे राज्यातील उच्चांकी 42.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद, परभणी, नांदेड, सोलापूर, जळगावमध्ये तापमान 40 अंशांपुढे; पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत कमाल तापमान 39 अंशांच्या आसपास