टीका करणं सोपं आहे,पण उद्धव ठाकरे होणं अवघड !- ना.जितेंद्र आव्हाड

मुंबई(वृत्तसंस्था)विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन संदर्भात केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. सलाम!, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी इतर देशांनी कोरोनाकाळात जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही, बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून,असा प्रश्न आव्हाड यांनी फडणवीसांनी केला आहे.