5 एप्रिल रोजी लोकशाही दिन होणार ऑनलाइन!

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात 5 एप्रिल 2021 रोजी होणारा लोकशाही दिन व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित राहून तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.