राजेश साळुंखे यांचे दुःखद निधन!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील रहिवासी ह मु.शिवाजी नगर शिरुड नाका, अमळनेर व नवलभाऊ कृषी महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. राजेश वसंतराव साळुंखे, (वय ५०) यांचे दिनांक ०१/०४/२०२१ रोजी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले,पुतणे असा परिवार असून ते पत्रकार डॉ विलास पाटील यांचे लहान बंधू होते.