त्रैमासिक विवरण पत्र सादर करण्याचे सहायक आयुक्तांचे आवाहन!

0

जळगाव (प्रतिनिधी) सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र शासन व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, निम शासकीय कार्यालये, महामंडळे, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक आणि कारखान्यांनी त्यांच्याकडील माहे जानेवारी 2021 ते माहे मार्च 2021 या कालावधीत कार्यरत मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र 31 मे 2021 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने सादर करावे.
सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा) कायदा, 1959 व नियमावली 1960 अन्वये त्रैमासिक विवरणपत्र भरणे/सादर/अद्ययावत करणे बंधनकारक आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. 0257-2239605 वर संपर्क साधावा. विवरणपत्र न भरल्यास आणि आस्थापना दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, डॉ.राजपाल म. कोल्हे, यांनी कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!