माफक दरात रेमडीसिवर इंजेक्शन उपलब्ध केल्याबद्दल मा आमदार शिरीष चौधरी यांचा सत्कार!

अमळनेर (प्रतिनिधी) कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
अश्या परिस्थितीत रुग्णांना रेमडी सिवर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असतांना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळनेरकरांसाठी जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे इंजेक्शन माफक दरात उपलब्ध करून दिले आहे.त्यानिमित्त विक्री केंद्रांवर भेट दिली असता केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद डेरे,सचिव प्रशांत पाटील,खजिनदार सचिन चोपडा, मोहसीन पठाण यांनी शिरिषदादा चौधरी यांचे शाल पुष्प देत सत्कार करून आभार मानले.या प्रसंगी गटनेते बबली पाठक, माजी नगरसेवक सुरेश आबा चौधरी, पंकज चौधरी ,हरीषचंद्र पाटील,पराग चौधरी, गणेश पाटील,ब्रिजलाल पाटील,प्रमोद चौधरी ,सुरेश आबा चौधरी,आबु महाजन,चेतन चौधरी आदी उपस्थित होते.