प्रजाराज्य न्यूज – आजच्या हेडलाईन्स!

शुक्रवार,2 एप्रिल 2021
▶️ महाराष्ट्रात 3,66,533 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 24,33,368 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 54,898 रुग्णांचा मृत्यू.
▶️ भारतात 6,10,925 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,15,22,884 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,63,428 रुग्णांचा मृत्यू
▶️ GST कलेक्शनचा नवीन रेकॉर्ड: मार्चमध्ये मिळाला 1.23 लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू, हे आतापर्यंतचे सर्वाधिक कलेक्शन.
▶️ सातारा जिल्हा परिसरात अधूनमधून अवकाळी पाऊस, महाबळेश्वरमध्ये एक ते दीड तास धुवाधार गारांचा पाऊस; स्ट्रॉबेरीसह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान.
▶️ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: वनविभागाची 9 सदस्यीय चौकशी समिती स्थापन; या प्रकरणी दोन अधिकाऱ्याचे निलंबन झाले असून पोलिस तपासही सुरू.
▶️ नाशिक: जेलमधून सुटलेल्या गुंडांच्या स्वागतासाठी त्यांची मिरवणूक काढल्याप्रकरणी दहापैकी आठ गुंड आणि त्यांच्या सतरा समर्थकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल.
▶️ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ च्या निवडणुकीसाठी तब्बल 482 अर्ज दाखल.
▶️ आयपीएलच्या 14व्या हंगामाला 9 दिवस शिल्लक; चेन्नई सुपरकिंग्स संघातील ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडची आयपीएलमधून माघार
▶️ बंगाल निवडणुकीत 80% मतदान: मतदानादिवशी नरेंद्र मोदींची सभा, ममता बॅनर्जींची राज्यपालांकडे तक्रार
▶️ गुगल नकाशात महाराष्ट्रातील काही गावे गुजरात राज्यात; गुगल नकाशावार वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेअंतर्गत दर्शवण्यात आली