प्रजाराज्य न्यूज – सायंकाळ हेडलाईन्स!

गुरूवार 1 एप्रिल 2021
▶️ जळगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग 753 जे च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रुपये मंजूर, हा रस्ता दोन पदरी किंवा चार पदरी करण्यात येणार!
▶️ व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे, सर्व व्याजदर कायम राहणार; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं ट्विट; 31 मार्च रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याज दर कपातबाबत घेतला होता निर्णय!
▶️ सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या स्कॉर्पियोमधून जप्त केलेल्या जिलेटिनच्या कांड्या, NIA ची पुष्टी, काळ्या रंगाची एक ऑडीही या प्रकरणात जप्त; जिलेटिनच्या कांड्यावर नोंदलेल्या नावाच्या आधारे NIA लवकरच कंपनीच्या लोकांशी संपर्क साधून चौकशी करण्याची
▶️ औरंगाबाद- वाळुंज येथील मनू इलेक्ट्रिकलच्या मालकास अमेरिकेतील एका भामट्याने त्यांच्या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल विदेशातून मागवतेवेळी समोरील कंपनीच्या ई-मेल आयडीशी मिळताजुळता मेल तयार केला; 18 लाख 28 हजार 317 रुपयांचा घातला गंडा.
▶️ जेव्हा जेव्हा नकाशामध्ये मार्ग शोधला जाईल तेव्हा प्रथम पर्यावरणास अनुकूल मार्ग डीफॉल्ट येणार, पण जर तुम्हाला इको फ्रेंडली रुट नको असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय देखील उपलब्ध.
▶️ सिनेसृष्टीत सर्वात मानाचा असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना जाहीर; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा !
▶️ इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बुधवारी फ्रान्समध्ये तिसऱ्या लॉकडाउनची घोषणा करताना शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील अशी दिली माहिती, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे रुग्णालयांवर प्रचंड ताण येण्याची शक्यता.