गुरुवार,1 एप्रिल 2021

▶️ आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत 30 जून 2021 पर्यंत वाढविली, सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय

▶️ महाराष्ट्रात 3,56,243 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 24,00,727 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 54,649 रुग्णांचा मृत्यू

▶️ अमरावती: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांना नोटीस जारी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

▶️ मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवले; 4 जण ठार, 1 गंभीर जखमी; रेवदंडा-रोहा मार्गावर भरधाव वेगाने ट्रक चालवणारा मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात

▶️ मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला

▶️ राज्यात रेडीरेकनरचा दरात कोणताही बदल न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, सध्याचे दर हे 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी कायम

▶️ जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता 2021 अहवालात भारत 156 देशात 140 व्या क्रमांकावर राहिला; भारताचे स्थान 28 क्रमांकांनी घसरले

▶️ महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांचे वीज दर बदलणार, आज गुरुवारपासून दरमहा 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचा दर प्रति युनिट 2 ते 9 पैशांनी कमी होणार

▶️ भारतात 5,80,345 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,14,72,494 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,62,960 रुग्णांचा मृत्यू

▶️ नागपूर महानगर व पोलीस आयुक्त परिसरात 31 मार्चनंतर राज्य शासनाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे रात्रीची जमावबंदी फक्त सुरू असणार, अन्य कोणतेही स्थानिक निर्बंध नसणार : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!