आमदार अनिल पाटील व जयश्री पाटील यांनी घेतली सपत्निक लस !

अमळनेर( प्रतिनिधी)अमळनेरचे आमदार अनिल पाटील माजी नगराध्यक्षा व जि.प.सदस्या जयश्री पाटील दोघांनी सपत्निक लस घेतली.
सध्या सर्वत्र कोरोना मोठ्या प्रमाणावर बळावला आहे. याचबरोबर शासनाने जनतेच्या सुरक्षेसाठी लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे आमदार अनिल पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांनी दोघांनी लस घेतली. लसीबाबत अनेक शंका कुशंका नागरिक घेत आहेत. मात्र कोणतीही शंका न घेता जनतेने मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वतःची व कुटुंबाचे संरक्षण करून घ्यावे असे आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन आदी उपस्थित होते.