अमळनेरात राबविला जाणार “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) नियमित शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण “व्यक्तिमत्व विकास” व्हावा, या पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर शनिवारी “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे (नागपूर) व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाशिक जीएसटी विभागाचे उपायुक्त मधुकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, खा शि मंडळाचे माजी कार्याध्यक्ष बजरंगलाल अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय भदाणे, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस. आर. चौधरी, निवृत्त उपप्राचार्य डॉ एस.ओ माळी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, नोबल फाउंडेशन चे अध्यक्ष जयदीप पाटील, खा शि मंडळाचे संचालक सी ए नीरज अग्रवाल, युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील, शिवशाही फाउंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे आदी उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. डी ए धनगर यांनी आभार मानले.
▶️असा असेल उपक्रम…!
विद्यार्थ्यांचे मन, भावना, शरीर, बुद्धी, सामाजिक जाणीव यांचा विकास झाला तर त्यांचे व्यक्तिमत्व संतुलित आणि संपन्न होते. या पार्श्वभूमीवर “चला व्यक्तिमत्व विकास घडवूया” हा उपक्रम माध्यमिक शिक्षक उमेश काटे यांनी विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांना सुचविला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दर शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. शाळेतील शिक्षिका कल्पना महंत, व्ही सी पाटील, एन बी खंडारे, जी पी हडपे, उमेश काटे, लता पवार, नीलिमा पाटील, सुनील पाटील, सुनील साळुंखे, सुरेश पाटील, नितीन पाटील, कल्याण नेरकर , किरण पाटील, आर आर पाटील आदी शिक्षक पुढाकार घेत मार्गदर्शन करणार आहेत.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक व सामाजिक विकास होणार आहे. व्यक्तिमत्व विकासामुळे आळस, अनुत्साह व निरसतेमध्ये अडकलेले विद्यार्थी हे कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि ध्येयाने प्रेरित होणार आहे. नैतिक मूल्यांचे धडेही या निमित्ताने त्यांना दिले जाणार आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, शिक्षण मानद संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे यांनी कौतुक केले आहे.