शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान सांगितले,त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार असून त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचेही सांगितले.