बस अपघातात ११ जणांचा मृत्यू: मृतांना ५ लाखाची मदत!

0

नाशिक (प्रतिनिधी) औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या भीषण बस अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. खासगी बस आणि टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका लहान मुलासह १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.मृतांमध्ये १० पुरुषांचा समावेश आहे. तर २९ प्रवाशी जखमी असून त्यापैकी ३ जण गंभीर जखमी आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हालवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटना स्थळी भेट घेऊन घटनेचे तीव्र दु:ख व्यक्त केले असून अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च देखील राज्य सरकारकडून केला जाईल असे त्यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!