बँकेची नोकरी सांभाळून दीपक देसले झाले एलएलबी उत्तीर्ण!

अमळनेर (प्रतिनिधी)येथील युनियन बँक ऑफ इंडिया येथे नोकरी करीत असतांना केवळ मेहनत आणि जिद्दीच्या बळावर दिपक शरदराव देसले हे एलएलबी ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.धुळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ मधून त्यांनी शिक्षण घेत अंतिम वर्षात ८७.१७ % गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले आहेत . दीपक देसले यांचे शिक्षण बी.एस्सी.बीएड (मॅथ) पर्यंत झालेले असून बँकेची नोकरी सांभाळत विशेष प्रयत्नाद्वारे त्यांनी हे यश मिळवले आहे.सदर यशाबद्दल त्यांचे मयूर पाटील,श्रीकांत भुसारी, उदय पाटील,किशोर सोनवणे,सागर जेठवा यांनी अभिनंदन केले आहे.