अमळनेरला 27 रोजी शांतता कमिटीची बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) प्रजाराज्य न्यूज
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता.२७) दुपारी दिडला अमळनेर शहरातील जी.एस. हायस्कूलमध्ये शांतता कमिटीची बैठक होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ, तहसीलदार मिलींदकुमार वाघ, मुख्यधिकारी प्रशांत सरोदे यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी सदस्य उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.