अमळनेरला प्रेरणादायी व्याख्यानमालेतून मिळाले स्पर्धा परीक्षेचे धडे

0

अमळनेर (प्रतिनिधी) प्रजाराज्य न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती (नवी दिल्ली) रुक्मिणीताई कला-वाणिज्य महिला महाविद्यालय, विजयनाना पाटील आर्मी स्कूल व साने गुरुजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहा दिवसीय प्रेरणादायी व्याख्यानमाला घेण्यात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना या व्याख्यानमालेतून यशाची गुरुकिल्ली प्राप्त झाली. येथील रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात १९ ऑगस्ट ला सकाळी दहाला प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य प्रा.डॉ. एस ओ माळी यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस जे शेख, उपप्राचार्य प्रा. श्याम पवार यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा.डॉ. माळी यांनी “मला अधिकारी व्हायचं” या विषयावर पहिले पुष्प गुंफले. शनिवारी (ता.२०) सकाळी दहाला विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे इंग्रजी शिक्षक उमेश काटे यांचे “यूपीएससी एमपीएससी म्हणजे काय?” या विषयावर व्याख्यान देऊन यशाचे गमक सांगितले. यावेळी जागृती बागुल या विद्यार्थिनीने श्रीकृष्णाचा पेहराव घालून दहीहंडी फोडली. यावेळी पायल राठोड, हर्षाली फतरोड, निकिता कोळी, नंदिनी सैंदाणे, निकिता सरदार आदी सह विद्यार्थिनी सहभाग घेतला. सोमवारी (ता.२२) सकाळी दहाला पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांचे “स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी” या विषयावर मार्गदर्शन करून प्रशासनात युवा अधिकाऱ्यांना येण्याचे आवाहन केले. मंगळवारी (ता.२३) सकाळी दहाला महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्याम पवार यांचे “स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन केले. बुधवारी (ता.२४) सकाळी दहाला महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. मंजुषा खरोले यांचे “स्पर्धा परीक्षेत महिलांची वाढती संख्या” या विषयावर तर गुरुवारी (ता.२५) सकाळी दहाला महिला महाविद्यालय चे सहाय्यक प्राध्यापक सुनील वाघमारे यांचे “स्पर्धा परीक्षेत इतिहासाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान झाले. युनिक अकॅडमीचे प्रमुख प्रा.गिरासे यांनी “स्पर्धा परीक्षेतील बदल” यावर विद्यार्थ्यांनीना सविस्तर मार्गदर्शन करून व्याख्यानमालेचा समारोप केला. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठान चे मानद संचालक प्रा.सुनील गरुड , प्राचार्य डॉ. एस.जे .शेख,उपप्राचार्य प्रा.श्याम पवार, प्रा.डॉ.एच .एस.जाधव, प्रा.सुनील वाघमारे, प्रा.डॉ. अमोल दंडवते, प्रा.डॉ. मंजुषा खरोले, प्रा.इंद्रायणी मोरे, प्रा.चारुशीला ठाकरे, साने गुरुजी फाउंडेशन चे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. प्रा.डॉ. अमोल दंडवते यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.सुनील वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!