निसर्डी येथील नवीन पाणीपुरवठा योजना गावासाठी ठरणार वरदान-आ.अनिल पाटील

0

▶️ निसर्डी येथे विविध 42 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेसह विकासकामांचे भुमीपूजन
अमळनेर (प्रतिनिधी) निसर्डी गावासाठी 42.66 लक्ष निधीतून जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना गावासाठी वरदान ठरणारी असून यामुळे पाणी संकटावर निश्चितपणे मात होणार आहे असा विश्वास आ.अनिल भाईदास पाटील यांनी निसर्डी येथे विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला.
निसर्डी ता.अमळनेर येथे विविध विकासकामांचे भुमीपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते,गावात आगमन होताच आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.याप्रसंगी जलजीवन मिशन अंतर्गत 42.66 लक्ष निधीतून पाणीपुरवठा योजना,क्रीडा विभाग अंतर्गत 7 लक्ष निधीतून व्यायामशाळा बांधकाम आणि 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून गाव दरवाजा बांधणे आदी कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यानंतर पुढे बोलताना आमदार पाटील यांनी जलजिवन मिशन अंतर्गत गावात पाणी पुरवठा योजना कशी मंजूर केली तीच महत्व काय ते स्पष्ट केले तसेच क्रीडा विभाग अंतर्गत मंजूर झालेल्या व्यायामशाळेचा गावातील तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी आणि शरीर सुदृढतेसाठी उपयोग करावा असे आवाहन केले,मतदारसंघात आज पर्यंत केलेल्या कामाचा लोखाजोखाही आमदारांनी मांडला त्याच बरोबर पीकविमा आणि अतिवृष्टीचे पैसे संपुर्ण जिल्ह्यात आपल्या तालुक्याला जास्त मिळवून देण्यात यश आल्याचेही आमदारांनी आवर्जून सांगत मतदारसंघातील राहिलेल्या समस्या जरूर सोडविणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, कामगार नेते एल.टी. नाना पाटील, सरपंच वैशाली प्रविण पाटील, उपसरपंच कपूरचंद ताणकू पाटील, मंगरुळ सरपंच संदिप पाटील, लोंढवे सरपंच वाल्मिक पाटील, खडके सरपंच रमेश मिस्तरी, माजी सरपंच भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य आथाबाई पाटील, प्रताप मोरे, अफ्रुकबाई पाटील, रामबाई पाटील, सुनंदाबाई पाटील, दमोताबाई पाटील, भुषण पाटील, राहुल पाटील, दिपक पाटील, जयेश पाटील, संदिप पाटील, योगेश पाटील, किरण पाटील, गणेश पाटील, रोहित पाटील, हर्षल पाटील, राहुल भदाणे, मयुर पाटील, भुषण पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!