अॅड.सारांश सोनार यांनी पटकावले टाटा मोटर्सचे राज्यस्तरीय उपविजेते पद!

अमळनेर (प्रतिनिधी)पुणे येथे संपन्न झालेल्या टाटा मोटर्स आयोजित कलासागर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमळनेरचे अॅडव्होकेट सारांश धनंजय सोनार यांनी उपविजेते पद पटकावले. त्यांना टाटा मोटर्स चे उपाध्यक्ष मोहन सावरकर यांचे हस्ते गौरविण्यात आले.
युवकांना प्रेरित करणाऱ्या या स्पर्धेत प्रसिद्ध युवा वक्ता सारांश धनंजय सोनार यांनी ‘भारत हा सर्व समावेशक देश आहे’ या विषयावर प्रभावी मत प्रदर्शन करून रसिकांची दाद मिळविली.
टाटा मोटर्स चे उपाध्यक्ष मोहन सावरकर यांचे हस्ते दिमाखदार सोहळ्यात सारांश सोनार यांचे सह विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.
अत्यन्त चुरशीच्या या स्पर्धेत राज्यातील अनेक युवकांनी भाग घेतला होता. त्यांना आकर्षक मानपत्र, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आले.
मानाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत युवा वक्ता सारांश सोनार यांनी प्राप्त केलेल्या या यशा बद्दल प्रा डॉ विजय तुंटे, डिगंबर महाले, डॉ जी एम पाटील, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ रमेश माने, प्रा पराग पाटील, प्रा डॉ लीलाधर पाटील, ऍड एस आर पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, लिलाचंद विसपुते, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित विसपुते, अमळनेर वकील संघ, सुवर्णकार समाज व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.
