वाघोदे येथे उल्लेखनीय विकासकामांचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

0

नवीन पाणीपुरवठा योजनेसह महत्वपूर्ण कामांचा समावेश
अमळनेर-जनहीताची विकासकामे करणे हेच आपले एकमेव ध्येय असून हे करताना कोणतेही संकट आले तरी जनतेच्या आशीर्वादाने त्यावर मात करण्यात मी नक्कीच यशस्वी होईल असा आशावाद वाघोदे ता.अमळनेर येथे विविध विकासकामांच्या भुमीपूजन प्रसंगी अमळनेर मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राष्ट्रवादीचे विधीमंडळ मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केला.
गावात आगमन होताच आमदारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले,प्रत्यक्ष गावकऱ्यांच्या भेटी घेऊन समस्याही त्यांनी जाणून घेतल्या,त्यानंतर आ पाटील यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.यावेळी तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील कामगार नेते ऐल.टी पाटील, सरपंच चेतन काशिनाथ पाटील, उपसरपंच सौ कौशल्याबाई भिवराम पाटील, मंगरुळ सरपंच संदिप पाटील, लोंढवे सरपंच अशोक पाटील, खडके सरपंच रमेश मिस्तरी, माजी सरपंच भरत पाटील, कृष्णा पाटील, विश्वास पाटील, साहेबराव पाटील, सचिन पाटील, मायाबाई सैंदाने, रामकृष्ण पाटील, देवा भिल, अजय पाटील, कैलास पाटील ज्ञानेश्वर पाटील, हर्षल पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, इंदलसिंग पाटील, राहुल भदाणे, राजेंद्र पाटील, शरद गढरे,दिलिप पाटील, गणेश पाटील राहुल भदाणे, मयुर पाटील, भुषण पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते…!
▶️ या कामाचे झाले भूमिपूजन
2515 निधीतुन नव स्मशानभूमी बांधणे. रक्कम रु. 7.00 लक्ष,सामाजिक न्याय विभाग निधीतुन बंदिस्त गटार करणे, रक्कम रु. 3.25 लक्ष ,जलजिवन मिशन अंतर्गत- गावात नवीन पाणी पुरवठा योजना करणे रक्कम रु. 29.82 लक्ष,डी.पी.डी.सी अंतर्गत- मराठी शाळेला वॉलकंपाउंड करणे. रक्कम रु. 15.92 लक्ष,डी.पी.डी.सी अंतर्गत- अंगणवाडी बांधकाम करणे रक्कम रु. 11.15 लक्ष,क्रिडा विभाग अंतर्गत- व्यायाम शाळा बांधकाम करणे, रक्कम रु.7.00 लक्ष

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!