26 रोजी अमळनेर येथे ‘जल्लोष स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम!

अमळनेर (प्रतिनिधी) भारताच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिला विराजमान झाल्या बद्दल अमळनेर च्या फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे नवव्या वर्धापन दिनानिमित्त ‛जल्लोष स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम २६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता मराठा मंगल कार्यालयात आयोजित केला आहे.
प्रथमच देशातील सर्वोच्च पदावर एका आदिवासी महिलेला संधी मिळाली आहे. याचा तमाम महिलांना आनंद झाला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या फिनिक्स ग्रुप ने हा क्षण एक सोहळा म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे फिनिक्स ग्रुपच्या अध्यक्षा अॅड.ललिताताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिनिधी म्हणून तालुक्यात सरपंच पदावर असलेल्या ९ आदिवासी महिला व पंचायत समितीच्या माजी सभापती वजाताई भिल ,जिल्हा परिषद सदस्या सोनू पवार ,संगीता भिल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच वसुंधरा लांडगे ,करुणा सोनार यांचे पोवाडे व गीताचा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी सर्व महिला मेणबत्त्या लावून राष्ट्रपती पदाचा जल्लोष साजरा करणार आहेत. प्रास्ताविक वसुंधरा लांडगे यांनी केले. या महिला उत्सवात सर्व महिला पुरुषांनी मराठा मंगल कार्यालयात सहभागी होण्याचे आवाहन फिनिक्स ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.