अमळनेरात अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प साकारणार-आमदार अनिल पाटील

0

▶️ अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त स्मारकावर अनेकांनी केले अभिवादन
अमळनेर (प्रतिनिधी) मी माझ्या व्यथा कुणापुढे मांडू इथली व्यवस्थाच भ्रष्टतेने रंगून गेली,असे सांगणाऱ्या अण्णाभाऊं साठे यांची जयंती अमळनेरात आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी धुळे रोडवरील स्मारकावर अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, दीड दिवसाच्या शिक्षणावर 35 कादंबऱ्या, 8 पटकथा,3 नाटके 13 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 1प्रवासवर्णन, 12 उपहासात्मक लेख लिहून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या व्यथा वेदना आणि अश्रू यांना वाचा अण्णाभाऊंनी फोडली आणि न्याय मिळवून दिला,अश्या महापुरुषांची जयंती ही असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पाडणे गरजेचे आहे. समाजाला एकत्र करून सर्वांना त्यांचे जीवन कार्य सांगणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून मानवंदना देऊया.आणि पुढच्या जयंती अगोदरच अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प तयार करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले
सामाजिक कार्यकर्ते डी ए धनगर यांनी सांगितले की,रशियाच्या चौकात जाऊन शिवरायांचे पोवाडे गाऊन शिवरायांचा इतिहास महात्मा फुले नंतर जर कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर तो शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केला आहे.प्रा अशोक पवार यांनी 15 ऑगस्ट ला देशाला स्वतंत्र मिळालं पण आमचं काय ह्या देशात अजूनही 29 कोटी लोकांना खायला भाकरी नाहीत म्हणून हे स्वातंत्र्य नसून केवळ सत्तेचे हस्तांतरण आहे. म्हणून 16 ऑगस्ट ला मोर्चा काढून ये आ झुठी है देश की जनता भुकी है हा हुंकार अण्णाभाऊंनी फुंकला जे आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर ही तंतोतंत लागू पडते.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्यासह प्रांताधिकारी सीमा अहिरे,न प मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, तहसीलदार मिलिंद वाघ,पी आय हिरे, पीएसआय भुसारे, आरोग्य अधिकारी संतोष बिऱ्हाड़े, युवराज चौहान,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष विजय गाढे,प्रा डॉ विजय तुंटे, प्रा डॉ जाधव,डी ए धनगर,डॉ निखिल बहुगुणे, डॉ रुपेश संचेती,डॉ दिनेश पाटील, डॉ बालाजी कांबळे,डॉ राजीव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीते साठी सुरेश कांबळे, हरीचंद्र कढरे गुरुजी, समाधान मैराळे, नारायण गांगुर्डे,जितेंद्र कढरे,बाजीराव कढरे,प्रेम बोरसे,राकेश खैरनार, किरण संदानशिव,प्रविण बैसाने, बाळासाहेब सोनवणे, आत्माराम अहिरे, फकिरा मरसाळे,मनोज बहिलम, आदीनी अथक प्रयत्न केले. यावेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!