राजेंद्र नारायण पाटील यांचे निधन;24 रोजी अंत्ययात्रा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीराम नगर मधील रहिवासी निवृत्त आरोग्य सहाय्यक राजेंद्र नारायण पाटील (वय-६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.२४) सकाळी अकराला येथील श्रीराम नगर मधील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते निंभोरा (ता अमळनेर) येथील मूळ रहिवासी आहेत. ते माजी ग्रामपंचायत सदस्य श्रावण उत्तम पाटील यांचे पुतणे, निवृत्त शिक्षिका शांताबाई उत्तम पाटील यांचे भाचे तर किरण पाटील व प्रितम पाटील यांचे वडील होत.पोलीस हवालदार योगेश श्रावण पाटील यांचे मावसभाऊ नितीन पाटील, विनोद पाटील, शरद पाटील, व विरेंद्र पाटील यांचे चुलतभाऊ होत.