इंदोर अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळून 12 जणांचा मृत्यू!

जळगाव (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अमळनेर आगाराची इंदोर अमळनेर बस क्रमांक एम एच 40 एन 9848 ही आज दि . १८ जुलै , २०२२ रोजी सकाळी ०७.३० वा इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली . आज सकाळी सुमारे १०.०० ते १०.१५ च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवून नर्मदा नदीत कोसळल्यामुळे १२ प्रवासी मयत झाले असून मयतात ९ पुरुष ३ स्त्री यांचा समावेश असल्याबाबतची प्राथमिक माहिती मिळाली आहे . सदर अपघातात जळगाव जिल्हयातील मयत झालेल्या प्रवासी यांची नावे खालीलप्रमाणे
१. प्रकाश श्रावण चौधरी , ( वाहक ) वय ४० वर्षे , रा . शारदा कॉलनी , अमळनेर
२. चंद्रकांत एकनाथ पाटील , ( चालक ) वय ४५ वर्षे , रा . अमळनेर
३. अविनाश संजय परदेशी , ( प्रवासी ) रा . पाटन सराई , ता . अमळनेर
४. निंबाजी आंनदा पाटील , ( प्रवासी ) वय ६० वर्षे , रा . पिळोदा , ता . अमळनेर
५. आरवा मुर्ताजा बोहरा , ( प्रवासी ) वय २७ वर्षे , रा . मुर्तीजापुर , अकोला , महाराष्ट्र ( माहेर अमळनेर . ) तसेच इतर जिल्हयातील मयत प्रवासींची नावे
१. राजु तुळशीराम , ( प्रवासी ) वय ३५ वर्षे , रा . रावतफाटा , चित्तोडगढ , राजस्थान
२. जगन्नाथ हेमराज जोशी , ( प्रवासी ) वय ६८ वर्षे , रा . मुकामपुर मल्लाडा , उदयपुर , राजस्थान
३. चेतन रामगोपाल जागीड , ( प्रवासी ) रा . नाकगलकला गोविंदगढ , जयपुर , राजस्थान
४. सैफउद्दिन अब्बास अली बोहरा , ( प्रवासी ) रा . मुरानी नगर , इंदोर , मध्यप्रदेश
५. विकास सतीष बेहरे , ( प्रवासी ) वय ३३ वर्षे , रा . विरदेल , जि.धुळे , महाराष्ट्र ,
६. कल्पना विकास उर्फ गुलाबराव पाटील , ( प्रवासी ) वय ५७ वर्षे , रा . बेटावद ता . शिंदखेडा जि . धुळे
७. रुख्मणीबाई नारायणलाल जोशी , ( प्रवासी ) रा . बागोर , उदयपुर , राजस्थान
घटनास्थळी जळगाव जिल्हा प्रशासन तर्फे तहसिलदार मिलिंदकुमार वाघ,अमळनेर , पोलीस विभाग , आरोग्य अधिकारी नगरपालिका अमळनेर व तालुका आरोग्य अधिकारी अमळनेर यांचे पथक ३ रुग्णवाहिकांसह मदतीकरीता रवाना झाले आहे . जखमी प्रवासी व त्यांचे कुटूंबियाचे मदतीकरीता आवश्क ती सर्व मदत करण्याच्या हेतुने जळगाव जिल्हा प्रशासन हे खरगोन व धार जिल्हा प्रशासनाच्या नियमीत संपर्कात असून अपघातग्रस्त व्यक्तींना सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.अधिक माहितीबद्दल
हेल्पलाईन क्रमांक : घटनास्थळी मदतीसाठी ० ९ ५५५८ ९९ ० ९ १ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष : ०२५७-२२२३१८० / २२१७१ ९ ३




