जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

जळगांव( प्रतिनिधी)जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणी साठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपत्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात जिल्ह्यात पावसामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ झाल्यास जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की स्थानिक प्रशासनातर्फे दिलेल्या सूचनाचे पालन करावे व खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी.

  1. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदी काठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
  2. नाले/ओढे काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे, नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे.
  3. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
    4.पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
  4. जुनाट तसेच मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. 6.पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये.
    7.जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत तारेपासून सावध राहावे.
    8.पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्नपदार्थ खाऊ नये.
  5. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये.
  6. पिण्याचे पाणी उकळून प्यावे व जेवणाआधी हात स्वच्छ धुऊन घ्यावे.
  7. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
    12.घाट,डोंगर रस्ते, अरुंद रस्ते दरी, खोरी येथून प्रवास करणे टाळावे.
  8. धरण, नदीक्षत्रामध्ये, धबधबे डोंगर माथा, घाट ,कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
    आपत्कालीन परिस्थितीत खालील नियंत्रण कक्षात संपर्क करावा
  9. जिल्हा नियंत्रण कक्ष – टोल फ्री क्रमांक 1077/ 0257-2217193/ 2223180
  10. जिल्हा पोलीस मुख्यालय नियंत्रण कक्ष जळगाव – टोल फ्री क्रमांक 100/ 0257-2223333/2235232
  11. जळगाव महानगरपालिका नियंत्रण कक्ष – टोल फ्री 101/ 102/ 0257 -2237666/0257-2224444
  12. जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव
    रुग्णवाहिका टोल फ्री 108
    0257-2226611

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!