6 जून रोजी ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात जयश्री पवार होणार सहभागी

अमळनेर (प्रतिनिधी) जळोद (ता अमळनेर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका श्रीमती जयश्री पवार-पाटील यांची ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात निवड झाली आहे. त्यांनी या कार्यक्रमासाठी असलेले एकूण ७ टप्पे पार करीत थेट हॉट सिटवर जाण्याचा मान मिळविला आहे. हा कार्यक्रम ६ जून पासून ‘सोनी’ मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. जयश्री पाटील प्रत्यक्षात ८ जून ला बुधवारी रात्री ९ वाजता हॉट सीटवर खेळणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. जयश्री पाटील या धुळे जयहिंद शाळेची माजी विद्यार्थिनी असून नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दहिवद (ता. अमळेनर) येथील प्रा. संदीप पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. धुळे- येथील जयहिंद हायस्कूलचे निवृत्त आदर्श शिक्षक व युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते दिलीप पवार यांची कन्या तर पुणे येथील नादमुद्रा ग्रुपचे संचालक प्रसिद्ध गायक धनंजय पवार यांच्या त्या भगिनी तर सडावण जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांच्या वहिनी आहेत.
माजी कुलगुरु के.बी. पाटील, जयहिंदचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, प्राचार्य पी.एच. पवार, गटशिक्षणाधिकारी शर्मिला चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी आर.डी. महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी. धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना वाडीले यांच्या सह शिवशाही फाउंडेशन, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंच व खान्देश साहित्य संघाच्या सदस्यांनी कौतुक केले आहे.