आघाडीच्या घटक पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा फेरविचार करावा-प्रा.सुनील गरुड

राज्यसभेच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्रातून द्यावयाच्या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या मतदानाच्या विधिमंडळाच्या कोटा संख्येवरून उमेदवार देण्याचा अंतिम विचार केला असून कुठल्याच राजकीय पक्षाने पक्षीय विचारधारेवरती राजे छत्रपती संभाजींना उमेदवारी दिली नाही. आणि त्यांनाही अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवायची असून कुठलाही पक्ष प्रवेश त्यांना करावयाचा नाही अशी त्यांची अंतिम भूमिका असून त्यांना शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी सरकारचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी दिल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला न्याय दिल्यासारखे होईल. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हा भारत देश अखंड ठेवला अशा या जागतिक कीर्तीच्या कर्तबगार राज्याच्या घराण्यातील वंशजाला आघाडी सरकारने उमेदवारी देऊन समस्त बहुजन समाजाचा सन्मान करावा. सातत्याने भारतीय जनता पक्ष जाती-जातींच्या भेदाचे राजकारण करत असून समाजामध्ये कलह वाढत आहे.तसेच धर्मा-धर्मांमध्ये देखील मतभेदाच्या द-या तयार झाल्या आहेत. अशा सामाजिक विषमतेच्या परिस्थितीत व धार्मिक तोंदवांमध्ये जर छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत उमेदवारी दिली तर आघाडी सरकारचे समाज कौतुकच करेल. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्ववान इतिहासाच्या स्मृती जागृत होऊन समाजामध्ये एकसंघ विचाराची मुहूर्तमेढ होईल. महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतील भारतीय जनता पक्षाचा वंश, वर्ण व जातिभेदाला जर छेद द्यावयाचा असेल तर संभाजीराजेंना आघाडी सरकारने पुरस्कृत उमेदवार जाहीर करावा. एक मराठा समाजाचा सैनिक म्हणून मी प्राध्यापक सुनील गरुड आघाडी सरकारकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी सल्ला देण्याचे माझे वय नाही किंवा मार्गदर्शन करण्याचे माझे वय नाही. परंतु मनातील खंत व्यक्त करीत आहे
मराठा सैनिक
प्रा. सुनील गरुड,जळगाव