कन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी भैय्यासाहेब पाटील

व्हाइस चेअरमनपदी महादू पाटील यांची निवड
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील
कन्हेरे,बिलखेडे,फापोरे खु विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बिलखेडे पोलीस पाटील रविंद्र भगवान पाटील यांचे बंधू भैय्यासाहेब भगवान पाटील तर व्हाइस चेअरमनपदी महादू चिंतामण पाटील यांची निवड झाली.
कार्यकारणी सदस्य मधुकर ताराचंद पाटील,गोविंदा तुळशीराम पाटील,अर्जुन माधवराव पाटील,नाना पारधी,लताबाई भगवान पाटील उपस्थित होते.
परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अरुण पुंडलीक पाटील
गटनेते अभिमन नथ्थू पाटील यांनी केले.
धनराज कौतिक पाटील,रविंद्र शालिग्राम पाटील,संजय भिका पाटील,गणेश जयराम पाटील,विरभान धर्मा पाटील,दादाभाऊ तानकू पाटील,जिजाबराव यशवंत पाटील,राजू रामदास पाटील,योगेश गुलाबराव पाटील,पाटील भाऊ सरपंच कन्हेरे,शशिकांत नीळकंठ पाटील,सुनिल काशिनाथ पाटील,ज्ञानेश्वर गोरख पाटील,पिंटू गोपीचंद पाटील यांनी सहकार्य केले.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाइस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.
