धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्रविण भदाने व्हाईस चेअरमनपदी बबन नगराळे

धुळे (प्रतिनिधी) धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँकेच्या चेअरमनपदी प्रविण भदाने आणि व्हाईस चेअरमनपदी बबन नगराळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल गटनेते निशांत रंधे गटनेते रविंद्र खैरनार, बँकेचे संचालक भूपेंद्र बाविस्कर,सोनाली भामरे सीईओ संजय देसले व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. त्यांच्या या निवडीबद्दल अंमळनेर शाखेच्या वतीने शाखा व्यवस्थापक गिरीश पाटील सहायक शाखा व्यवस्थापक सुनील पाटील रोखपाल रमेश पाटील व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.